घात अपघात

Accident … धारुर घाटात पुन्हा अपघात; एक ठार.

69 / 100

किल्लेधारुर दि.8 जुन – Accident धारुर Dharur शहरानजीक असलेल्या घाटात आज दि.8 जून शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खत घेवून जाणारा ट्रक पलटी होवून एक जण ठार झाल्याची दुर्घटना घडली. ( Accident … Truck Overturned in Dharur Ghat; Two injured. )

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर घाटातील Dharur Ghat एका अवघड वळणावर शनिवारी (दि.8) सकाळी अपघात Accident घडला. धाराशिवहून माजलगावकडे खताचे पोते घेवून जाणारा ट्रक ( क्र. एम एच 25 यु 0251 ) एका वळणावर ब्रेक निकामी होवून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. यात ड्रायव्हर व क्लिनर गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमीना नागरीकांनी तात्काळ धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना चालक राहुल चंदनशिवे ( वय 36 वर्ष) ठार झाल्याची तर क्लिनर विष्णु सुरवसे (वय 25 वर्ष) पाय फ्रैक्चर असल्याची माहिती मिळाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!