बस चालकाने बसमध्येच घेतला गळफास; कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या.

- लातूर दि.6 अॉक्टोंबर – एसटी बस चालकाने (ST driver) बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्येच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. लातुर (Latur) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. गेल्याच महिन्यात अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील संगमनेरमध्ये असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तर धुळ्यातही (Dhule) एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
(In Latur, a bus driver strangled himself in a bus; The incidence of employee suicides increased.)
उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.
संजय केसगिरे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याआधीही एसटी (State Transport Board) बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.
दुसरीकडे, पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री इथे घडली. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही अनियमित असल्यामुळे शेवटी कंटाळून कमलेश बेडसे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. वाढत्या आत्महत्यांच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.