महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू…. उद्यापासून नवीन नियमावली.

मुंबई 8 जानेवारी – महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत (Corona virus) झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कठोर पावलं उचलली जात असून राज्यात नवी नियमावली (New guidelines) जाहिर करण्यात आली आहे.

(In Maharashtra, daytime curfew and night curfew … new rules from tomorrow.)

या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या काल (7 जानेवारी) दिवसभरात मॅरेथॉन बैठका पार पडल्या. त्या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरना स्थितीचा आढावा घेतला.

रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.  उद्या मध्य रात्रीपासून दि.10 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत राज्यात कडक निर्बंध (restrictions) लावण्यात आले आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. रात्रीस नाईट कर्फ्यू तर दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दिवसा 5 पैक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार. 50% नाट्यगृह, सीनेमागृह राज्यातील हाँटेल आणि रेस्टाँरंट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद. दिवसा 50% क्षमतेने सुरू रहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना 72 तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.

उद्या मध्यरात्रीपासून नवी नियमावली लागू …
-शाळा, महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांस मुभा
-स्विमिंग पूल, स्पा, सलुन राहणार बंद
-टुरिस्ट स्पॉट, किल्ले ,म्युजियम बंद
-शॉपिंग मॉल्स ,मार्केट मध्ये 50% क्षमतेने उपस्थिती
-दोन डॉस घेतलेले जाऊ शकतात

-रात्री दहा नंतर बंद
-RAT testing करावी लागणार
-हॉटेल रेस्टर्नत 50%क्षमतेने सुरू राहणार रात्री दहा वाजता बंद होणार
-नाट्यगृज सिनेमगृह 50% क्षमतेने

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!