बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा आजची तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.10 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1252 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 29 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1223 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-4, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-2, केज-8, माजलगाव-1, परळी-8, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या कमी होवून तिसरी लाट ओसरल्याचे दिसून येता आहे. काल दहा तालुक्यात 15 तर आज किंचित वाढ होवून 29 रुग्ण आढळले आहेत. चालू आठवड्यात सोमवारी 41, मंगळवारी 53 काल 15 तर आज 29 बाधित आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या बुधवारच्या नोंदीनूसार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी दोन मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2862 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 514 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 1.17 टक्के, रिकव्हरी रेट 96.87 तर डेथ रेट 2.64 आहे.

दरम्यान, राज्यात आज (9 फेब्रुवारी) 7 हजार 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 92 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वीस हजाराच्या आसपास असून, सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे.

बुधवारी 7 हजार 142 नव्या रुग्ण आढळून आले. त्यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.83 टक्के इतके आहे. 20 हजार 222 इतके रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या 75 लाख 93 हजार 291 इतकी आहे. हे प्रमाण 97.07 टक्के इतके आहे. 7 कोटी 59 लाख 5 हजार 676 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.31 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 23 हजार 385 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 5 लाख 78 हजार 76 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 82 हजार 893 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!