बीड जिल्ह्यातील घटना… प्रेमसंबंधातून प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रियकर दगावला तर प्रेयसी वाचली.

बीड दि. 18 जानेवारी – बीड (Beed) जिल्ह्याच्या गेवराई (Gevrai) तालुक्यातील भेंड बुद्रुक याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सोबत मरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलासोबत (commits suicide) विपरीत घटना घडली आहे. या घटनेत दुर्दैवी प्रियकराचा जीव गेला असून दोर तुटल्यामुळे प्रेयसीचा जीव मात्र वाचला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

(Incidents in Beed district … Couple’s suicide attempt due to love affair; If the lover betrayed, the lover survived.)

या घटनेची माहिती तलवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत. जयपाल लक्ष्मण वाव्हळ असं आत्महत्या केलेल्या 27 वर्षीय युवकाचं नाव आहे. तो गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक येथील रहिवासी होता. मृत जयपाल याचं मागील काही काळापासून कल्याण येथील एका 30 वर्षीय विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते.

फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर, त्यांच्यात प्रेम फुललं होतं. यानंतर त्यांनी प्रत्यक्षात एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांचं हे गुपचूप प्रेम प्रकरण सुरू होतं. पण विवाहित महिलेचं आपल्या गावाकडे सारखं येणं जाणं वाढल्याने त्यांच्या प्रेमाची कुणकुण प्रेयसीच्या पतीला लागली.

यातच दोन दिवसांपूर्वी संबंधित विवाहित महिला भेंड बुद्रुक येथे आली होती. दरम्यान तिच्या पतीने दोघांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या प्रियकर आणि विवाहित प्रेयसीनं सोबत जगता नाही आलं म्हणून काय झालं? सोबत मरू असं म्हणत मृत जयपालच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये जयपालचा मृत्यू झाला आहे. पण दोर तुटल्याने विवाहित प्रेयसी वाचली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (17 जानेवारी) पहाटे घरातील आडूला या प्रेमी युगुलानं गळफास घेतला असल्याचे गावकऱ्यांनी पाहिलं.

यानंतर त्यांनी फोनवरून घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. कुवारे करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!