माझं गाव

passed away… धारुरचे प्रतिष्ठित सराफा व्यापारी रामचंद्र चिद्रवार यांचे निधन.

52 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि. 26 सप्टेंबर – किल्ले धारूर येथील प्रतिष्ठित सराफा व्यापारी व माजी नगरसेवक रामचंद्र पुरुषोत्तम चिद्रवार यांचे वयाच्या 69 वर्षी ह्र्दय विकाराच्या झटक्याने आज सकाळी 8.40 मिनिटांनी निधन passed away झाले.

धारुर शहरातील सोन्या व चांदीच्या सराफा व्यवसायात विश्वसनीय नाव म्हणून ओळखले जाणारे चिद्रवार कुटूंबीयांतील माजी नगरसेवक रामचंद्र चिद्रवार यांनी आज जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक असणारे व शहराच्या विकासात भर घालणाऱ्या अनेक क्षेत्रात रामकाकांचा नावलौकिक होता. ते गेले काही दिवस आजारी होते. त्यांनी गिरिराज नागरी पतसंस्था, वसंतराव भागवत आश्रमशाळा संचालक तसेच धारुर नगर परिषदेचे दोन वेळा नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कार्य केले. अभिजीत ज्वेलर्सचे मालक अभिजीत व अक्षय चिद्रवार व अक्षय कलेक्शनचे मालक नगरसेवक रुपेश चिद्रवार यांचे ते वडील होत. तर आदर्श शिक्षक आशोक चिद्रवार यांचे लहान बंधू व गिरीराज पतसंस्थेचे चेअरमन अनिल चिद्रवार यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता पोलिस स्टेशन मागिल वैकुंठधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!