महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागणार….. विधानसभा अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

मुंबईः दि.४ फेब्रुवारी- विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही वेळापुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केला. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे अध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्ष असलेल्या झिरवळ यांच्याकडे आला आहे.

राज्यात काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसच्या (Congress) प्रमुख तीन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात भोर विधानसभाचे आमदार संग्राम थोपटे, दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. तर तिसरे नाव अमीन पटेल यांचे आहे. पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!