घात अपघात

जखमी सहशिक्षक गुळवे यांचे निधन; केज तालुक्यात झाला दुचाकीचा अपघात.

केज दि.24 एप्रिल – केज (Kaij) तालुक्यातील युसुफ वडगाव येथील रहिवासी तथा येवता जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक गुरुलिंग किशनराव गुळवे (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी (दि.23) त्यांचा अपघात झाला होता. सदर अपघाताचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

सहशिक्षक गुरुलिंग गुळवे हे शनिवारी सायंकाळी दुचाकीवरुन प्रवास करत असताना सोनिजवळा ते केज दरम्यान त्यांच्या दुचाकीचा अपघात (Accident) झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु मार जास्त असल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून मयत गुळवे यांच्या पार्थिवावर युसुफ वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, शनिवार हा अपघात वार ठरला असून लातूर अंबाजोगाई (Latur Ambajogai) रोडवर मोठा अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला. याच ठिकाणी रात्री दहाच्या सुमारास रस्त्यावर उभ्या ऊसाच्या ट्रॉलीखाली एक इनेव्हा गाडी व एक दुचाकी घुसून अपघात झाला. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून चार जण जखमी असल्याचे कळते.

काल दि.23 शनिवारी सांयकाळी 6.30 च्या सुमारास केज बीड रोडवर जीप व दुचाकीच्या अपघातात एक शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर केज तालुक्यातील सोनीजवळा ते केज रस्त्यावर शनिवारीच झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका सहशिक्षकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे शनिवारचा दिवस अपघात वार ठरल्याचे दिसून येत आहे.

( Injured co-teacher Gulve dies; A two-wheeler accident took place in Kaij taluka. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!