माझं गाव

सिंगापूर येथे शिक्षण घेणाऱ्या बालकांची धारुरात अभिनव उपक्रम; धारुरकरांनी केले कौतूक.

किल्लेधारूर दि.14 जानेवारी – सिंगापूर येथे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बालकांनी किल्लेधारूर शहराच्या बाजारपेठत मकर संक्रांती निमित्त ना नफा ना तोटा तत्वावर फिरून मास्क विकले. कोरोनाची जनजागृती करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Innovative activities for children studying in Singapore; Appreciated by Dharurkar.)

किल्लेधारूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी (Eminent merchants) राजाभाऊ तोष्णिवाल यांचा मुलगा चेतन तोष्णिवाल हा सिंगापूर (Singapore) येथे नौकरीस आहेत. तो सध्या सुट्टी घालवण्यासाठी गावी आलेला आहे. त्यांची मुलं राम चेतन तोष्णीवाल, माधव चेतन तोष्णीवाल व राधिका जीवन तोष्णीवाल या तीन बालकांनी दुकानी आल्यावर त्यांचे काका जिवन तोष्णिवाल यांना मकरसंक्रांत (Makar Sankranti) दिनी शुभकार्य काय करावे या संदर्भात विचारले.

त्यांनी कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर मास्क (Mask) विक्री करुन जनजागृती करण्याचे पुतण्यासह मुलीला मार्गदर्शन केले. या बालकांनी काकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे एका बाॅक्सला दोरी बांधून एक पेटी तयार करत गळ्यात घालून बाजारपेठेत फिरून मास्क विक्री केली.

लहानपणापासून सिंगापूर येथे राहणाऱ्या बालकांनी आपल्या देशाच्या व जन्मगावी प्रेमासाठी चांगले काम करण्यासाठी कोरोनाची जनजागृती हे काळाची गरज ओळखून ना नफा ना तोटा तत्वावर मास्क वाटप करून त्याचे बोबड्या शब्दात सांगितले.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रभाव (Corona outbreak) वाढलेला दिसून येत आहे. यामुळे जनजागृतीसाठी किल्लेधारूर (Dharur) शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ तोष्णीवाल यांचा नातू राम चेतन तोष्णीवाल (8 वर्षे) वयाच्या मुलाने भाऊ बहिणी सोबत केलेल्या कार्याबद्दल शहरात कौतुक होत आहे. त्यांच्याकडुन अनेक व्यापारी व नागरिकांनी मास्क खरेदी केली. या अनोख्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!