Irshalwadi landslide… रायगडमधील इरशाळवाडीवर दरड कोसळली; 7 मृत्यू 178 आडकले.

रायगड दि.20 जुलै – Irshalwadi landslide रायगडमधील खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. यात 50 ते 60 घरे दबली असून 7 जणांचा मृत्यू झाला तर या दरडीखाली 178 हून अधिक लोक दबले आहेत. या दुर्घटनेनंतर काही वर्षापूर्वी घडलेल्या माळीण Malin दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ( Irshalwadi landslide… A landslide hit Irshalwadi in Raigad; 6 deaths 100 trapped.)
सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. यातच मध्यरात्री रायगड Raigad जिल्ह्यात खालापूर येथील इरशाळ गावावर डोंगर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच या गावातील कुटुंबाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. दरम्यान सकाळी 6.30 वाजता एनडीआरएफ NDRF च्या बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासह मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरिश महाजन हे गावात तळ ठोकून आहेत.
खालापूरच्या इरशाळ येथे दरड landslide कोसळल्यानंतर प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले. एनडीआरएफच्या NDRF दोन टीम, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि इतर गावातील रहिवासी मदतकार्य करत आहेत. लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन Helpline नंबर जारी केला आहे. 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. तसेच या ठिकाणी एक पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षातून मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर काही वर्षापूर्वी घडलेल्या माळीण Malin दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.