ऐकावे ते नवलच…. शिधापत्रिकेसाठी तरुणाने काय केले पहा…

वडिलां पासून विभक्त राहत असलेल्या अविवाहित  तरुणाचा शिधापत्रिका मिळवण्यासाठीचा अजब फंडा

पाटोदा दि.२७ (प्रतिनिधी) आई-वडिलांपासून विभक्त राहत असल्याने एका अविवाहित तरुणाने शिधापत्रिका मिळवण्यासाठी चक्क तहसील कार्यालयात वरात नेवून अजब आंदोलन केले. यामुळे शेवटी तहसील (Tahsil) प्रशासनाने नमते घेवून सदरील तरुणाला शिधापत्रिका (Ration Card) दिल्याची घटना दि.२६ गुरुवार रोजी घडली.

याबाबत सविस्तर वृत असे की, पाटोदा (Patoda) तालुक्यातील धनगर जवळका गावातील अमित घनशाम आगे याने विज्ञान शाखेतून गणिताची पदवी घेतली आहे. आई-वडिलां पासून विभक्त राहत असल्याचे कारण देत दि.८ सप्टेंबरला त्याने पाटोदा तहसील (Patoda Tahsil) कार्यालयाकडे शिधापत्रिके साठी अर्ज केला. परंतु तो एकटा असल्याने व कुटुंबाची व्याख्या पूर्ण होत नसल्याने तहसीलदारांनी त्याला शिधापत्रिका (Ration Card) नाकारली. वारंवार खेटे मारूनही त्याला शिधापत्रिका मिळाली नाही. त्यावर या सुशिक्षित बेरोजगाराने चक्क लग्नपत्रिका छापून तहसील कार्यालयानेच मला सुशिक्षित, गोरी व नम्र अशी मुलगी शोधून लग्नाचा बार उडवून द्यावा व शिधापत्रिका द्यावी अशी मागणी केली. एवढेच नाही, तर त्याने लग्न पत्रिकाही छापून दि.२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या मुहूर्तावर नवरदेव बनून तो पाटोदा (Patoda) तहसील (Tahsil) कार्यालयात वराडींसह पोहोचला. यामुळे गडबडून गेलेल्या तहसील प्रशासनाने अखेर सदरील तरुणाला शिधापत्रिका (Ration Card) दिली. शिधापत्रिकेसाठी तहसील कार्यालयाकडे केलेली वधूची मागणी व त्यासाठी छापलेल्या गंमतीशीर लग्नपत्रिके मुळे तो तरुण चांगलाच चर्चेत आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!