अंबाजोगाईत ‘जगदाळे मोटर्स’ला भीषण आग;

अंबाजोगाई दि.2 जुलै – शहरातील प्रशांत नगर भागातील ‘जगदाळे मोटर्स’ या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या शोरुमला (Electric motorcycle showroom) शुक्रवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. आग इतकी भीषण होती की शोरूममधील सर्व मोटरसायकल जळून खाक झाल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती समोर येत आहे.

(Jagdale Motors catches fire in Ambajogai; Burn millions of goods.)

याबाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई (Ambajogai) शहरातील प्रशांतनगर भागात असलेल्या ‘ओकीनावा’ इलेक्ट्रिकल मोटारसायकल शोरुममध्ये (Electric motorcycle showroom) मोटारसायकलच्या हेवी लिथेनियम बॅटरीचा स्फोट होऊन शोरूमला आग लागली. या आगीमध्ये शोरुममध्ये उभ्या असलेल्या 6 मोटारसायकलसह इतर साहित्य जळून खाक झाले. आगीच्या ज्वाला धुरासह उंच उठू लागल्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

शोरुमला लागलेल्या आगीमध्ये शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागताच घटनास्थळी अंबाजोगाई (Ambajogai) नगरपालिकेची अग्निशमन दलाची (fire brigade) गाडी तात्काळ पोहोचल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुंदडा यांनी तात्काळ वीज बंद करण्याची सूचना महावितरण कंपनीस केली. दोन्ही फिडरवरील वीजपुरवठा तात्काळ बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!