करुणा शर्मा यांचा कोठडीचा मुक्काम वाढला; काय आहे कारण पहा…

अंबाजोगाई दि.14 सप्टेंबर – जातिवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तुल आढल्याप्रकरणी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई (Ambajogai) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात त्यांचा न्यायालयीन कोठडीचा मुक्काम वाढला असून शनिवारी सुणावनी होणार आहे.

(Karuna Sharma’s cell stay extended; See what’s the reason …)

तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

दरम्यान न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असलेल्या करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर आज (14) तारीख देण्यात आली होती. मात्र, ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे. त्या न्यायाधीश रजेवर असल्याने इतर न्यायालयासमोर आज सुनावणी पार पडली. करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणीसाठी आज दिनांक 14 तारीख देण्यात आली होती.

मात्र, ज्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश (Additional District Sessions Judge) सापत्नीकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहेत. त्या न्यायाधीश (Judge) आज रजेवर आहेत. त्यामुळे आज दुसऱ्या न्यायालयात या जामीनावर सुनावणी पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार न्यायमुर्ती सापत्नीकर 16 सप्टेंबर पर्यंत रजेवर आहेत.

काय आहे प्रकरण…
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने शर्मा आणि त्यांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 5 सप्टेंबरला दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल (Pistol) ठेवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी देखील ॲट्रासिटी (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!