बीडमध्ये कोरोना बाधितांची संख्या सहाशेकडे; बीड, अंबाजोगाई, आष्टीत कहर; केज 50 तर धारुर 11

बीड दि.5 एप्रिल- राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2255 प्राप्त अहवाला पैकी 575 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1680 जण निगेटिव्ह आली आहेत. आज एकोणतिसाव्या दिवशी बीड तालुक्यात आज तब्बल 150 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीडनंतर दुसरे हॉटस्पॉट अंबाजोगाई तालुका ठरत आहे. आज अंबाजोगाईत 127 तर आष्टीत 80 बाधित आढळली आहेत. धारुर 8 तर केजमध्ये 34 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.

(The number of corona sufferers in Beed is about six hundred; Beed, Ambajogai, Ashtit Kahar; Kaij 50 and Dharur 11)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-150, अंबाजोगाई-127, आष्टी-80, धारुर-11, गेवराई-18, केज-50, माजलगाव-35, परळी-48, पाटोदा-29, शिरुर-24, वडवणी-3
अशी आहे.

सध्या कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात मोठा संसर्ग दिसत आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.5 सोमवारी दुपारी आजची आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात बाधितांची संख्या आज सर्वाधिक 575 झाली आहे. बीड जिल्ह्यात लावण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन आज संपला आहे. कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत.

दरम्यान, रविवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 57,074 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 222 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत 55 हजार 878 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 4 लाख 30 हजार 503 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!