रात्री तालुक्यात ‘कोसळधार’…. कुंडलिका ओव्हरफ्लो.

किल्लेधारूर दि.31 अॉगस्ट – सोमवारी दमदार पाऊस तर रात्री धुंवादार पाऊस असं चित्र तालुक्यात पहायला मिळालं. या पावसामुळे उपळी येथील कुंडलिका तलाव यावर्षी लवकरच पाण्याने ओव्हरफ्लो (Overflow) होऊन सांडवा वाहू लागला आहे. हा तलाव वडवणी व धारूर तालुक्यात व्यापलेला असल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

(‘Kosaldhar’ in the taluka at night …. Kundalika overflow.)

गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने दमदार पुनर्आगमन केले आहे. यामुळे तालुक्यातील बहुतेक तलाव तुडूंब भरलेले दिसत आहेत. धारुर (Dharur) व वडवणी तालुक्यात हरित क्रांती करणारा कुंडलिका तलाव ही लवकरच पाण्याने तुडुंब भरला आहे.

गेल्या वर्षी या महिन्यामध्ये याच तलावात 70 टक्के जवळ पाणी साठा होता. तर या वर्षी या महिन्यातच तो तुडुंब भरून सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्या मुळे या परिसरातील जलसिंचनाचा प्रश्न व तसेच पिण्याचा प्रश्न मिटलेला आहे. या तलावावर आंबेवडगाव, गावंदरा, कारी, कूप्पा, बाबी, चिंचाळा, पूसरा नित्रुड या परिसरातील लहान मोठ्या गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

दरम्यान कुंडलिका तलावातून लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला (sugar factory) पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कारखान्याचा ही पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे. या परिसरात जास्तीत जास्त ऊसाचे क्षेत्र असून याचा फायदा शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी सुखावला आहे असे पाटबंधारे विभागाचे (irrigation department) अभियंता गुळभिले यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!