भर चौकात सराफा व्यापाऱ्यास लाखोंचा चुना… बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत भरदिवसा चोरी.

अंबाजोगाई दि.7 फेब्रुवारी – अंबाजोगाई (Ambajogai) शहरातील सराफा व्यापाराचे डिक्कीत ठेवलेल्या सोन्याच्या बँगीसह भर चौकातून स्कुटी घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे मात्र सराफा व्यापाऱ्यास नगदी रक्कमेसह लाखो रुपयांचे सोन्याला मुकावे लागले असून सदरील चोरीचा गुन्हा पोलिसांत (Police) नोंदवण्यात आला आहे.
(Lakhs of lime to bullion trader in Bhar Chowk … theft all day in Ambajogai in Beed district.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील गुरूवार पेठ भागामध्ये राठौर ज्वेलर्सचे दुकान मालक राहुल राठौर आज सकाळी दहा वाजता घरातुन येवून आपले दुकानाचे शटरला लावलेले कुलूप उघडू लागले. मात्र शटरच्या कुलपा मध्ये कोणीतरी फेविक्विक व खडे टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी कुलूप उघडण्यासाठी शिवाजी चौकातील कूलपाची चावी बनवणाऱ्या कारागिराकडे धाव घेतली.
आपली प्लेजर स्कुटी या दुचाकीच्या डिक्की मध्ये सोने चांदीचे दागिने सह नगदी रक्कम डिकीत ठेवलेले होती. स्कुटी चावी कारागिरांच्या समोरच भर शिवाजी चौकात वर्दळीच्या ठिकाणी उभी करून चावी कारागिरांना बोलत असतानाच कोणीतरी अज्ञात तरुणाने डुप्लिकेट (duplicate) चावी लावून दुचाकी पळवली.
सोने चांदीचे दागिने नगदी रक्कम, दुकानातील व्यवहाराच्या डायरी ठेवलेले लाखो रुपयाचे दागिने सह चोरट्याने प्लेझर गाडी चोरून धुम ठोकल्यामुळे राठौर ज्वेलर्सच्या (Jewelers) मालकांना लाखो रुपयांचा भुर्दंड झाला आहे. याचे तक्रार (complaint) देण्याचे काम चालू असून नेमके किती रुपयांचे ऐवज गेले हे तपासात कळेल.
मात्र कोणीतरी लक्ष ठेवूनच हे काम केल्याचे चोरट्यांनी वापरलेल्या शकले वरून दिसत आहे. सदरील प्रकार हा फिल्मीस्टाईल (Filmi style) सुनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. याप्रकारानंतर व्यापाऱ्यांत खळबळ उडाली असून चोरट्यांचा तात्काळ पोलिसांनी (Police) तपास लावावा अशी मागणी होत आहे.