बीडमध्ये धावणार लालपरी… एसटी कर्मचाऱ्यांत फुट; येवढे कर्मचारी कामावर रुजू.

मुंबई दि.26 नोव्हेंबर – एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) आंदोलनाला आता जवळजवळ एकोणिस दिवस होत आले आहेत. या आंदोलनावर काही तोडगा निघत नसला तरी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली. वेतनवाढीनंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात आता फूट पडताना दिसत आहे.

(Lalpari to run in Beed … feet among ST employees; This is how many employees work.)

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी शेवटचं अल्टिमेटम दिलं. कर्मचारी कामावर येण्याची वाट पाहू नाहीतर कारवाई करू असा इशारा परबांनी दिला होता. अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असताना वेतनवाढीनंतर जवळपास 10 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत.

महामंडळाने (ST corporation) दिलेल्या माहितीनुसार, 9 हजार 705 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. तर 457 एसटी शुक्रवारी रवाना झाल्या आणि 11 हजार 188 प्रवाशांनी शुक्रवारी एसटीतून प्रवास केला आहे. अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले आणि लालपरी पुन्हा धावायला लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भंडारा वसई आगारातून बस रवाना.
भंडारा (Bhandara) वसई येथील आगारातून बस रवाना झाल्या मात्र मुंबई, नाशिक आगारात शांतता पाहायला मिळाली. वेतनवाढीनंतर काही कर्मचारी कामावर रूजू झाले तर अजूनही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.

तासगावात एसटीवर दगडफेक.
तासगाव तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास (ST Workers Strike) गुरुवारी हिंसक असे वळण लागले. कुमठे फाटा, कवठेएकंदसह वंजारवाडी फाटा या ठिकाणी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांची मनधरणी करुन प्रवाशांच्या सोयीसाठी काही मार्गावर बससेवा सुरु केली. परंतु शिवसेनेच्या या भूमिकेने कर्मचाऱ्यांमधील असंतोष उफाळून आला.

अहमदनगरमध्येही कर्मचाऱ्यांची माघार.
जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एसटी बस कामगारांचा संप आज दुपारच्या चर्चेनंतर मिटला असून पोलिस (Police) बंदोबस्तात बस रवाना होत आहेत. एसटी संप मागे घेण्याबाबत कोणताही कर्मचारी बोलण्यास तयार नसल्याने शेवगाव तालुक्यातील आंदोलनाला पुढाकार घेणारे संजय नांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना मत स्पष्ट केले. जरी एसटी कर्मचारी यानी काम चालू केले असले तरी सुद्धा विलीनीकरण करण्यावर एसटी कर्मचाऱ्याचे ठाम असल्याचे मत आहे. असंही ते म्हणाले.

खेडमध्ये धावली बस…
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर खेड आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने खेड स्थानकातून पहिली एसटी चिपळूणकडे रवाना झाली आहे. तब्बल १९ दिवसांनंतर खेड (Khed) स्थानाकाच्या फलाटावर एसटी आल्याने स्थानकावर एसटीची वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये आनंद बघायला मिळाला. आता पुन्हा एकदा एसटी बस सुरू झाल्या तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

बीडमधून उद्या धावणार लालपरी.
बीड आगारातील 145 कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे उद्या दि.27 रोजी बीडमधूनही बससेवा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीड आगारातील प्रशासकीय विभाग यांत्रिक विभाग, चालक व वाहकांचा यात समावेश आहे. पोलिस बंदोबस्तात बीड (Beed) बसस्थानकातून बससेवा सुरु करणार असल्याची माहिती एका वृत्तपत्राशी बोलताना विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!