स्व.प्रभावतीबाई देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन
पत्रकार चंद्रकांत देशपांडे यांना मातृशोक

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) पत्रकार चंद्रकांत देशपांडे यांच्या मातोश्री स्व.प्रभावतीबाई गोंविदराव देशपांडे वय (९५) वर्ष यांचे वृध्दापकाळाने रविवारी रात्री उशीरा निधन झाले.
येथील कसबा विभागातील नामवंत व्यक्ती कै. गोविंदराव देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ९५ वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दुपारी ४ वाजता कसबा विभागात स्मशानभुमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या पत्रकार चंद्रकांत देशपांडे यांच्या मातोश्री होत.