विकासाची दुरदृष्टी असलेले नेतृत्व – आ. प्रकाशदादा सोळंके

ज मकरसंक्रात… मुळात माजलगाव मतदारसंघात मात्र राजकीय कार्यकर्त्यांत आजचा दिवस माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या वाढदिवसामुळे एक उत्सवरुपाने साजरा केला जातो. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) सलग सात वर्ष तालुकाध्यक्ष असलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत असलेले प्रा.ईश्वर मुंडे यांनी आमदारांबाबत व्यक्त केलेले मत त्यांच्याच शब्दात…


(Leadership with a vision for development – MLA Prakashdada Solanke)

बालाघाटांच्या (Balaghat) डोंगर कुशीत वसलेले मोहखेड ता.धारुर (Dharur) हे छोटेसे गाव. स्व. रत्नमाला (बाई) व स्व.सुंदरराव सोळंके साहेब यांचे प्रकाशदादा, चंद्रकांतराव, धैर्यशील काका व संजयराव अशी चार पुत्ररत्न. त्या पैकी संजयराव यांचे अपघातात निधन झाले. चंद्रकातराव हे पुणे येथे व्यावसायात अग्रणी आहेत. आ.प्रकाशदादा, धैर्यशील काका व जयसिंग भैया हे स्व.सुंदरराव सोळंके साहेबांचा सुसंस्कृत राजकीय वारसा चालवत आहेत.

आ.प्रकाशदादा सोळंके हे उच्च शिक्षण घेवून पुणे येथे यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत होते. परंतू समाजसेवा व जन विकास करणे या भावनेतून त्यांचे पाय परत गावाकडे ओढले गेले. आ.प्रकाशदादा सोळंके यांनी प्रथम मोहखेड गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. मोहखेडसह परिसरातील गावांतील मतदारांच्या भेटी घेतल्या. कांही गावांना कोणतेही वाहन जात नव्हते, त्या ठिकाणी चालत जावून मतदारांच्या भेटी घेवून मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. मतदारांनी ही भरभरून मतदानरूपी आशिर्वाद दिले आणि आ.प्रकाशदादा सोळंके यांचा राजकीय प्रवास सुरू झाला ते जिल्हा परिषद (Zilla Parishad) सभागृहात पोहचले.

त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समितीचे सभापती होता येत असल्यामुळे आ.प्रकाशदादा सोळंके माजलगाव पंचायत समितीचे सभापती झाले. सभापती (Chairman) म्हणून अत्यंत चांगले कार्य त्यांनी केले.

पुढे सतत तीन वेळा माजलगाव (Majalgoan) मतदार संघाचे आमदार म्हणून जनतेने आ.प्रकाशदादा सोळंके यांना पसंती दिली. माजलगाव मतदार संघात गाव तेथे रस्ता, विद्युत उपकेंद्रे, विविध नद्यांवर बंधारे, मोठ्या नद्यांवर साठवण तलाव, उपसा जल सिंचन योजना, माजलगाव एम.आय.डी.सी. (MIDC) मंजूरी व विकास, धारूर एम.आय.डी.सी. मध्ये रस्ते डांबरीकरण व विद्युत पुरवठा, गावोगावी शाळा खोल्या, अंगणवाडी बांधकाम, पांदन रस्ते, शीव रस्ते या विकासाच्या बाबी प्रामुख्याने केल्या आहेत.

आ.प्रकाशदादा सोळंके यांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची प्रशासनावर जबर पकड आहे. आढावा बैठकीत काय….म्हणत त्यांच्याकडे पाहताच भल्या भल्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडते. येथे कामच करावे लागते थातूर मातूर उत्तरांना थारा नाही. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेवून त्यांवर उपाययोजनाही तात्काळ केली जाते. म्हणून प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आ.प्रकाशदादा सोळंके यांचा सतत सन्मान ठेवतात.

तलाठी सज्जांच्या इमारतींपासून ते विविध प्रशासकीय कार्यालयांचे बांधकामे करून घेवून आ.प्रकाशदादा सोळंके यांनी मतदार संघातील जनता व प्रशासन यांची सोय करून दिली आहे. ही बाब मतदार संघातील जनता केंव्हाही विसरणार नाही. सांस्कृतीक व ऐतिहासिक बाबींच्या विकासाकडे आ.प्रकाशदादा सोळंके यांचे विशेष लक्ष असते. धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व विकासासह शहरातील न्यायालयाची इमारत, आयटीआय इमारत, मागासवर्गीय मुलींचे वस्तिगृह, जिल्हा परिषद शाळा इमारती पुर्ण केल्या. धुनकवाड येथील धनकेश्वर मंदिर व परिसराचा विकास, मतदार संघातील तलावांचा गाळ काढण्यासाठी वैयक्तिक आर्थिक मदत केली या गोष्टी सदैव अधोरेखीत कराव्या लागतील.

मागील पस्तीस वर्षापूर्वी स्व. लोकनेते सुंदरराव सोळंके साहेब यांनी तेलगाव सहकारी साखर कारखान्याचे पेटवलेले बॅायलर अखंडपणे चालू ठेवण्याचा बहुमान व श्रेय आ.प्रकाशदादा सोळंके व श्री धैर्यशील काका सोळंके यांनाच मिळते. परखड भाष्य व स्पष्टोक्ती हा आ.प्रकाशदादा सोळंके यांचा स्वभाव आहे. नवीन माणसांना त्यांचा स्वभाव रागीट वाटतो परंतू खोटया बाबींची चीड व खऱ्या गोष्टी बोलणे, खऱ्या गोष्टीवर प्रेम करणे, खऱ्याला न्याय देणे हा आ.प्रकाशदादा सोळंके यांचा स्वभावच आहे.

प्रथमदर्शनी रागीट वाटणारे आ.प्रकाशदादा सोळंके मऊ, मृदू, कोमल मनाचे आहेत. सर्व जाती धर्मांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांना योग्य न्याय, योग्य पदे, योग्य मान सन्मान देवून कार्य कर्त्यांचे सुख-दु:ख स्वत:च्या कुटुंबातील सुख दु:ख समजून सहभागी होतात म्हणून कार्यकर्त्यांना आ.प्रकाशदादा सोळंके हे फक्त आपले नेते आहेत असे न वाटतां आपले कुटूंब प्रमुख आहेत असे वाटून आ.प्रकाशदादा सोळंके यांचा मोठा आधार वाटतो.

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका यशस्वी स्री चा हात असतो ही बाब आ.प्रकाशदादा सोळंके यांना ही लागू पडते. उच्च शिक्षीत, सुसंस्कृत, सामाजीक कार्याची आवड असलेल्या सौभाग्यवती मंगलाताई प्रकाशराव सोळंके जिल्हा परिषद सदस्या तथा अध्यक्षा माजलगाव विकास प्रतिष्ठाण यांचा ही आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या सामाजीक, राजकीय, कौठुंबीक आरोग्यदायी यशस्वी जीवनांमध्ये बहूमोल वाटा आहेच.

लोकनेते सुंदरराव सोळंके साहेबांच्या सुसंस्कृत व विकासात्मक सामाजीक, राजकीय कार्याचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवण्याचे अविरत कार्य सर्वसामान्यांना सोबत घेवून आ.प्रकाशदादा सोळंके, श्री धैर्यशील काका सोळंके (Dhairyashil Solanke) , श्री.जयसिंगभैया सोळंके (Jaising Solanke), सौ.मंगलाताई सोळंके व ॲड.सौ.पल्लवीताई सोळंके चालवत आहेत.

14 जानेवारी हा आ.प्रकाशदादा सोळंके यांचा वाढ दिवस. सोळंके कुठुंबीय वाढ दिवसाचा डामडौल कधीही करत नाहीत. समाज उपयोगी कार्यातून जनता जनार्धनाचे आशिर्वाद मिळवणे,जनतेची सेवा हीच ईश्वर पुजा समजून सदैव कार्यतत्पर असणाऱ्या आ.प्रकाशदादा सोळंके यांना यशस्वी, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…..

(लेखक– प्रा.ईश्वर मुंडे, रा.गांजपूर ता.धारुर हे सात वर्ष धारूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष होते. ते आता प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यरत आहेत.)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!