शहर व तालुक्याची कोविड-१९ ची सद्यस्थिती….हजारो लोक प्रभावित

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) तालुक्यात सध्या २३ कंटेनमेंट झोन असुन यापैकी तीन गावे कंटेनमेंट तर शहरात २० कंटेनमेंट झोन आहेत. सध्या एकुण ४५ बाधित आहेत. यामुळे ८८१ घरातील साडेपाच हजार लोक प्रभावित झाली आहेत. आज शहरातील दोन कंटेनमेंट झोन शिथिल होत आहेत तर दोन वाढणार आहेत.

धारुर तालुक्यात सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. ३१ जुलै पासुन शहरात दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर तालुक्यातील गोपाळपुर येथे ४, घागरवाडा २ व उमरेवाडी येथे १ रुग्ण आढळली आहेत. याशिवाय भोगलवाडी येथील मुळ रहिवासी असलेल्या मात्र माजलगाव येथे स्थायिक झालेल्या एका महिलेचे औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना कोरोनाचे निदान झाले आहे. तर औरंगाबाद येथे शहरातील दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्याने उपचार सुरु आहेत. शहरात ३८ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण संख्या आहे. या रुग्णाच्या निवासी पत्त्यावर शहरात २० व ३ गावे कंटेनमेंट झोन करण्यात आलेली आहेत. या कंटेनमेंट झोन मधील ८८१ घरातील ५३४१ लोकं प्रभावित होवून बंदिस्त झाली आहेत. यापैकी घागरवाडा गावातील १४८ घरातील १४५२, गोपाळपुर येथील ३६९ घरातील १९४६ लोक तर उमरेवाडीच्या १०१ घरातील ७४५ लोक कंटेनमेंट झोन म्हणून प्रभावित आहेत. शहरातील पोस्ट कार्यालय परिसर व उदयनगर मधील कंटेनमेंट झोन आज शिथिल होत आहे. मात्र रात्री आढळून आलेल्या रुग्णामुळे जगनाथनगर येथे नवीन एक व शिक्षक कॉलनीतील कंटेनमेंट झोनचा विस्तार वाढणार आहे. यामुळे प्रभावित लोकांची संख्या वाढणार आहे. तालुक्यात आजपर्यंत ७० रुग्ण संख्या झाली आहे. यातील २९ जन उपचार घेऊन परतले आहेत. ३६ जनांवर उपचार सुरु आहेत. २ जनांचा मृत्यू झाला आहे तर ३ जन इतर जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!