लॉकडाऊन वाढवला मात्र लोकल १ फेब्रुवारी पासुन सुरु….

मुंबई: दि.२९- कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन (Lockdown) वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील लोकल (Local Railway) सेवा १ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. राज्य सरकारनं याबाबात परिपत्रक जारी केले आहे.
लॉकडाऊन (Lockdown) वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील (Mumbai) लोकल सेवा (Local Railway) १ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. गर्दीच्या वेळा टाळून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करता येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील (Mumbai) उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी दिले आहेत.