Maharashtra cabinet… खातेवाटपाचा तिढा सुटला, पहा संपूर्ण मंत्रिमंडळ.

मुंबई दि.14 जुलै – Maharashtra cabinet राष्ट्रवादी कांग्रेसच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक दिवस खातेवाटपावरुन खलबंत सुरु होती. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं नको म्हणून शिवसेना शिंदे गटातून जोरदार विरोध केला जात होता. अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बीडच्या धनंजय मुंडे यांच्याकडे अब्दूल सत्तार यांच्याकडे असणारं कृषी खातं देण्यात आले आहे. ( Maharashtra cabinet… Fissure of account sharing has been resolved, see the entire cabinet.)
असं असेल नवं खाते वाटप…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार
उपमुख्यमंत्री अजित पवार- वित्त व नियोजन
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित- आदिवासी विकास
गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – कृषि
सुरेशभाऊ खाडे- कामगार
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.