बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमिन प्रकरणी मोठी कारवाई; नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना अटक.

बीड दि.18 फेब्रुवारी – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रथमच महसूल विभागातील तत्कालीन नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याला एसआयटीकडून अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात बीड, आष्टी, अंबाजोगाई, धारुर आदी ठिकाणी वक्फ जमीन घोटाळे उघडकीस आलेले आहेत. अनेक तक्रारीनंतर धारुर वगळता बीड, अंबाजोगाई व आष्टी तालुक्यात याप्रकरणी गुन्हे नोंद झाली आहेत. धारुर येथील प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद नाही. या घोटाळ्याचा तपास एसआयटीकडे ( SIT ) देण्यात आला आहे. एसआयटी प्रमुख म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक ( Upper Superintendent of Police ) पंकज कुमावत ( Pankaj Kumawat ) यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या जमिन घोटाळ्या ( Waqf Board Land scam ) प्रकरणी वक्फ बोर्डाची जमिन प्रकरणी भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलीसात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये या दोघांनाही मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहब यांच्या 22 हेक्टर 49 गुंठे जमीन घोटाळ्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला अटक केल्यावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.
आष्टी तहसिल कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे, मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड या दोघांची काही दिवसांपूर्वी त्यांची चौकशी होऊन ताब्यात घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या अंती आष्टी पोलिसांनी दि.17 फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली असून आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनीच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या ( Police ) गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुरनं.205/2021 कलम 109, 409, 420, 467, 468, 120 ब, 34 भा दं वि. सह कलम 52 अ वक्फ अधिनियम 1954 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास अप्पर पोलिस अधीक्षक ( Upper Superintendent of Police ) पंकज कुमावत ( Pankaj Kumawat ) हे करत आहेत.
( Major action in Waqf Board land case in Beed district; Deputy Tehsildar and Mandal officers arrested. )