जिल्हा हिवताप निवारण विभागाकडून मठ गल्लीत फवारणी

तापीचे रुग्ण सापडल्याने उपाययोजना

किल्लेधारूर दि.४(प्रतिनिधी) येथील कसबा विभागांतील मठ गल्लीत चार डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते . सोमवारी जिल्हा हिवताप विभागाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . शिंदे सह कर्मचाऱ्यांनी भेट देवून मठ गल्लीतील परिसराची पहाणी केली. या वेळी येथील नागरिकांना काळजी घेण्याच्या सुचना देत परिसरात फवारणी करण्यात आली.

धारूर येथील मठ गल्लीत तापीच्या आजाराचे रूग्ण वाढले आहेत. चार रुग्ण डेंग्यूसदृश्य आढळले होते. याची तात्काळ दखल घेत सोमवारी बीड येथील हिवताप विभागाच्या पथकाने भेट दिली. या भागात नाल्या व परिसराची त्यांनी पहाणी करून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याच्या सुचना दिल्या. तसेच डेंग्यूसदृश्य आजार असणाऱ्या चार जणाचे रक्त नमुने तपासणी साठी घेतली आहेत. या वेळी नगराध्यक्ष डॉ . स्वरूपसिंह हजारी, मुख्याधिकारी सुहास हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचीन शेकडे, डॉ . चेतन आदमाने यांची उपस्थिती होती. याची माहिती डॉ मयूर सावंत यांना समजल्यानंतर त्यांनी गल्लीमध्ये जनजागृती करून संबंधित प्रशासन वैद्यकीय अधिकारी यांना माहिती देऊन त्यांनी तत्परता दाखवली. यावेळी आरोग्य अधिकारी सचीन शेकडे यांनी सांगितले की या भागातील डेग्यूदृश्य चार जणांचे रक्त नुमूने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच या भागात फॉगींग मशीनने धुर फवारणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!