मुळशी औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना; 17 मजूरांचा मृत्यू. महिलांची संख्या अधिक

पुणे दि.7 जून – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस (SVS Aqua Technologies) या रासायनिक कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
(Major fire accident in Mulshi industrial estate; 15 female and 2 male laborers died.)
कंपनीत 17 कामगार अडकले होते. यात 15 महिला व 2 पुरुषांचा समावेश आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. मदतकार्यात काही वेळा पुर्वी 14 महिला कामगारांचे जळालेल्या अवस्थेतील शव मिळाले.
आग लागल्याची माहिती समजताच पोलीस (Police) व अग्निशामक दलाने (Fire brigade) घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाचे (Fire brigade) नऊ बंब दाखल झाले आहेत. या शिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झालेल्या आहेत.
या कंपनीत अन्य केमिकल्स देखील तयार केले जातात. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे. यापरिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. घटनास्थळी तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
याबात अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस (SVS Aqua Technologies) या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत 37 कामगार होते, या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
कंपनीमध्ये सॅनिटायझर निर्मिती
ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
अग्निशामन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली असून कुलिंग काम सुरु असल्याची माहिती आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते.
(fire accident in Mulshi)