माझं गाव

धारुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; शेतातील झाडाला घेतला गळफास.

किल्लेधारूर दि.8 अॉगस्ट – धारुर (Dharur) तालुक्यातील अंबेवडगाव येथे रविवारी दि.8 रोजी सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास विवाहितेने शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

(Married woman commits suicide in Dharur taluka; The tree in the field was choked.)

सरस्वती श्रीहरी घोळवे (वय 30) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आज दि.8 रविवारी 5 वाजण्याच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दुरध्वनीवरुन घटनेची माहिती धारुर पोलिसात (Police) मिळाली असून घटनास्थळाकडे पोलिस रवाना झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) कानिफनाथ पालवे यांनी दिली. पोलिस पंचनामा सुरु असून या आत्महत्ये प्रकरणी अद्याप पोलिसात कसलीही नोंद झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!