
किल्लेधारुर दि.6 आक्टोंबर – Mayor reservation नगराध्यक्ष पदासाठी मुंबई येथे मंत्रालयातील दालनात आरक्षण सोडत सुरु असून बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने जाहिर झाले आहे. यामुळे आगामी नगर परिषद निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार असून नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्यासाठी इच्छूकांचे चेहरे समोर येणार आहेत.
असे आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण
बीड – अनुसूचित जाती (महिला)
माजलगाव – ना.मा.प्र. (महिला) (ओबीसी)
अंबाजोगाई – ना.मा.प्र. (ओबीसी)
परळी – सर्वसाधारण (महिला)
किल्लेधारुर – सर्वसाधारण
गेवराई – सर्वसाधारण (महिला)



