Monsoon Update… शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ? स्कायमेट संस्थेची मान्सून बाबत महत्त्वाची अपडेट.

मुंबई दि.14 जून – Monsoon Update स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मान्सून बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. येत्या चार आठवड्यात देशात पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज स्कायमेटकडून Skymate वर्तवण्यात आला असून या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. ( Monsoon Update… Added to farmers’ worries? Important update on Monsoon from Skymate organization. )
यंदा मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी आठवडाभर उशिर झाला आहे. यात समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल झाला मात्र बिपरजॉय वादळामुळे Cyclone Biperjoy मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. जस जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तस तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल असं भारतीय हवामान खात्यानं Indian Meteorological Department म्हटलं आहे.
सध्या अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे Cyclone Biperjoy गुजरात राज्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरात Gujrat किनारपट्टीवर 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी 10 ते 14 मीटर उंच लाटा उसळतील तर 25 सेंटीमीटरहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस वेळेवर न पडल्यास पेरणीला उशिर होऊ शकतो. पुढील चार आठवडे म्हणजेच 6 जुलैपर्यंत देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज स्काटमेटकडून वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे.