आता नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही; निरी संस्थेचं महत्वपूर्ण संशोधन.

नागपूर दि.19 मे – कोरोनाच्या आरपीसीआर चाचणीसाठी (RTPCR test) आता नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही. त्यासाठी आता आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील गरज नसणार आहे. नागपुरातील निरी संस्थेच्या (NEERI) व्हायरॉलॉजी शाखेनं (virology branch) कोरोना चाचणीसाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. कोरोना चाचणीसाठी (corona testing) सलाईन वॉटरच्या पंधरा सेकंद गुळण्या (saline water gargle) कराव्या लागतील. हेच सॅम्पल कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे. आता याला आयसीएमरने (ICMR) सुद्धा मान्यता दिली आहे.
(No need to take a swab through the nose or mouth anymore; Important research of Niri Institute.)
सध्या कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणीसाठी (RTPCR test) नाकात किंवा घशातील स्वॅब घेऊन तो रसायनिक द्रव असलेल्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे पाहण्यासाठी स्वॅबमधील विविध कणांमधील आरएनएन वेगळा करण्याची (एक्सट्रॅक्शन) प्रक्रिया असते. त्यानंतरच्या चाचणीत हा आरएनए कशाचा आहे, हे समजते आणि कोरोना संसर्ग झाला की नाही, याचे निदान होते.
त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा असली, तर चार तासांचा अवधी लागतो. मात्र, आता नागपुरातील निरी (NEERI) या संस्थेच्या व्हायरॉलॉजी शाखेनं (virology branch) कोरोना चाचणीसाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यासाठी आता आरोग्य कर्मचाऱ्यांचीही गरज पडणार नाही. परिणामी कोरोना चाचणीसाठी (corona testing) होणारी गर्दीही कमी होणार आहे. यासाठी फक्त सलाइन वॉटरच्या 15 सेकंद गुळण्या करून ते नमुने चाचणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाण्याची घनता ही हवेपेक्षा 800 पटीने अधिक असते. सलाईनच्या पाण्याच्या गुळण्यांमुळे विषाणू त्यामध्ये येईल. त्यामधून त्याला ट्यूबमध्ये घेता येईल. यामुळे स्वॅबसाठी जे तंत्रज्ञान लागत होते, जी गर्दी होत होती ती कमी होईल. या संशोधनामुळे संशयित रुग्णांचा त्रास कमी होणार आहे. याबरोबरच वेळेचा अपव्यय टळून लागलीच निदान होणार आहे. या नवीन संशोधनाला आयसीएमरने (ICMR) मान्यता दिली आहे.