विहिरीत पडलेल्या ‘त्या’ नवविवाहितेचा खून ; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारूर दि.17 अॉगस्ट – विहिरीत पडलेल्या नवविवाहितेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धारुर (Dharur) तालुक्यातील सुकळी येथे रविवार दि.7 रोजी घडली होती. मात्र माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करत दिलेल्या तक्रारीनंतर तसा बनाव केल्याचे उघड झाले असून विवाहितेचा खुन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राणी गणेश राऊत (वय 21) या रविवारी (दि.7) गावातील पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. यावेळी पाय घसरुन विहिरीत पडल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशी माहिती मयत विवाहितेच्या नातेवाईक व पोलिसांना देण्यात आली होती. मात्र माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत मयतेची आई मिरा भिमराव लांडगे यांनी पोलिसांत पती, सासू, सासरे यांच्या विरुध्द तक्रार दिली.
फिर्यादीवरुन पोलिसांनी (Police) तात्काळ पती गणेश ज्योतिराम राऊत, सासू सुनिता व सासरा ज्योतिराम यांचे विरुध्द कलम 304 ब, 306, 34 नुसार गुन्हा नोंदवून सर्व आरोपीनां ताब्यात घेतले. सदर प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर गुन्ह्यात 302 खुनाचा (Murder) गुन्हा वाढवण्यात आला. आरोपीना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास एपीआय एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेळके करीत आहेत.
तीन महिन्यापुर्वीच झाला होता विवाह…
नवविवाहितेचे तीन महिन्यापुर्वीच गणेश राऊत या सुकळी ता.धारुर या तरुणाशी विवाह झाला होता. त्यांचे माहेर माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील उमरी आहे. विवाहिता विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र विहिर खोल असल्याने विवाहितेचा शोध लागला नाही. पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत मृतदेह (dead body) शोधन्यासाठी अग्निशमन दलाला (fire brigade) पाचारण करावे लागले होते. अग्निशमन दलाच्या सुनिल आदाडे व त्यांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांतून प्रेत बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली होती. सदर घटनेमुळे सुकळी गावात हळहळ व्यक्त होत होती.
( Murder of ‘that’ newly married woman who fell in the well; Incidents in Dharur Taluka. )