अंबाजोगाईत तरुणाचा खून; दारुच्या वादातून घडला थरार.

अंबाजोगाई दि.24 जून – अंबाजोगाईतील क्रांतीनगर भागात दारू पिल्यानंतर दोन्ही चुलत भावात वाद झाला. या भांडणात एका भावाने दुसऱ्याला बेदम मारहाण करत गळा दाबून त्याचा खून (Murder) केला. संतोष लालासाहेब चव्हाण (वय 35) रा. बेलदार वस्ती, क्रांतीनगर, अंबाजोगाई असे मयताचे नाव आहे.
(Murder of youth in Ambajogai; The type that occurred from the alcohol dispute.)
मयत संतोषची पत्नी गंगुबाई यांनी पोलिसात (Police) दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोषला दारूचे व्यसन होते. संतोष आणि त्याचा चुलत भाऊ शिवाजी बळीराम चव्हाण या दोघात दारू पाजण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असत. मंगळवारी सकाळपासूनच ते दोघे मद्यपान करून सोबत होते. सायंकाळी 5 वाजता संतोषच्या घरासमोर मद्यधुंद अवस्थेत दोघे विनाकारण भांडत होते.
यावेळी भांडणात शिवाजीने संतोषला बेदम मारहाण करत खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून (Murder) केला. हे पाहून गंगुबाईने आरडाओरडा केला असता इतर नातेवाईक धावत आले आणि त्यांनी संतोषला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात (SRTR) दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
याप्रकरणी गंगुबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चव्हाण याच्यावर अंबाजोगाई (Ambajogai) शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिवाजी यास पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत