होमिओपॅथीचे औषध घेतल्याने 8 जणांचा मृत्यू; विलासपुर मधील धक्कादायक घटना.

विलासपुर दि.7 मे – कोरोना महामारीच्या या काळात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संक्रमनामुळे हजारो लोकांचे प्राण जात आहेत. कोरोना बाधित (Corona Positive) होण्याचे व मृतांचे आकडे दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र देशात दिसत आहे. मात्र दुसरीकडे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे.
(8 deaths due to taking homeopathic medicine; Shocking incident in Vilaspur.)
अशातच काल छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) विलासपुर येथे होमिओपॅथीचे (Homeopathy) एक औषध घेतल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून या लाटेसोबतच वेगवेगळ्या दुर्घटना देखील मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) विलासपूरमध्ये एका कुटुंबाने एका होमिओपॅथीक (Homeopathy) औषधाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 8 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.6 गुरुवारी घडली आहे. “होमिओपॅथीच्या ड्रॉसेरा 30 नामक एका औषधाचे या लोकांनी सेवन केले होते, ज्या औषधामध्ये देशी पद्धतीने बनवलेल्या दारूचे 91 टक्के एवढे प्रमाण होते” अशी माहिती सीएमओ,विलासपुर (Vilaspur) यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला असून, इतर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये औषधांचे चुकीच्या पद्धतीने, किंवा अतिरिक्त सेवन केल्याने अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी कोरोना (Corona) विरोधी औषधांच्या नावे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीच्या औषधी दिल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातही काही दिवसांपुर्वी आदिवासी बहुल भागात कोरोना बाधित (Corona Positive) महिलेवर अघोरी उपचार केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिवाय अनेक जण आजही तंत्र मंत्राचा वापर कोरोनावर उपचार करताना समोर येत आहे. गेल्या काही दिवसात अॉक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचा जीव गेल्याच्याही दुर्घटना घडल्या आहेत. एकीकडे देशात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग शिगेला पोहचत असताना अशा दुर्घटनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.