रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ कायम; अमेरिकन माध्यमांचा दावा कुटूंबियांनी फेटाळला.

अंबाजोगाई दि.10 एप्रिल – अंबाजोगाई येथील रुद्रवार दाम्पत्याचा बुधवारी अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातमीने महाराष्ट्रभर खळबळ उडाली. त्यात अमेरिकन मीडियाने पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या (Murder and suicide) केल्याचा दावा केला आहे. रुद्रवार कुटुंबियांनी अमेरिकन मीडियाचा (American media) हा दावा फेटाळला असून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतरच या घटनेचा उलगडा होऊ शकणार आहे. दरम्यान, रुद्रवार कुटूंबियांच्या मदतीसाठी खा. डॉ. प्रितम मुंडे (Pritam Munde) व खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत.

(Mystery of Rudrawar couple’s death remains; The American media claim was rejected by the family.)

अमेरिकेत (US America) उत्तर न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात स्थायिक झालेल्या अंबाजोगाई येथील आरती आणि बालाजी भारत रुद्रवार यांचे राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह बुधवारी सायंकाळी आढळून आले होते. याबाबत गुरुवारी रात्री अमेरिकन प्रसार माध्यमांनी (American media) न्यू जर्सी पोलिसांच्या हवाल्याने बालाजी यानेच गर्भवती पत्नीच्या पोटात चाकूने वार करून ठार मारले आणि नंतर त्याचा चाकूने स्वतःला भोसकून घेत आत्महत्या (Murder and suicide) केल्याची बातमी दिली आणि पुन्हा खळबळ उडाली.

अंबाजोगाईतील रुद्रवार कुटुंबीयांनी अमेरिकन माध्यमांचे आरोप फेटाळून लावले आहेत. बालाजी आणि आरती हे दोघेही खूप शांत आणि समजदार होते, त्यांच्यात कसलाही वाद नव्हता. या घटनेमागे घातपात असून त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी विनंती बालाजी यांचे वडिल भारत रुद्रवार यांनी केले आहे. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर आणि अमेरिकन पोलिसांनी किंवा अमेरिकन दुतावासाकडून (US Embassy) भारतीय दूतावासाला (Indian Embassy) अधिकृत माहिती दिल्यानंतरच या गूढ प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

दोघांचे मृतदेह मिळण्यास 8 ते 10 दिवस लागणार असल्यामुळे अंत्यसंस्कार अमेरिकेतच (US America) करण्याचा निर्णय कुटूंबियांनी घेतला आहे. या अंत्यविधीसाठी ‘एशियन इंडियन फ्युनरल होम’ नामक संस्था अंत्यसंस्कारासाठीची सर्व मदत करणार असल्याची माहिती भारतीय दुतावासाने (Indian Embassy) दिली आहे. बालाजी काम करत असलेली एल ॲण्ड टी हि कंपनी अंत्यसंस्कार आणि इतर सोपस्कारांचा खर्च उचलणार आहे.

मुलगा आणि सून तर गेले, मात्र आमची चार वर्षाची नात एकटीच अमेरिकेत आहे. तिच्या सोबत आमच्या कुटुंबातील कोणीच नाही. भारतीय आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयांनी समन्वय साधून आमच्या नातीचा ताबा लवकरात लवकर आम्हाला देण्यासाठी मदत करावी अशी विनंती भारत रुद्रवार यांनी केली. दरम्यान, बालाजी यांचा भाऊ विहाचा ताबा घेण्यासाठी अमेरिकेला जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

खा. प्रीतम मुंडें आणि खा. सुप्रिया सुळे मदतीसाठी सरसावल्या.
रुद्रवार कुटुंबियांना मदत करण्याबाबत खा. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली. त्याची तत्काळ दखल घेत मंत्रालयातून अमेरिकेतील दूतावासाशी (US Embassy) संपर्क साधण्यात आला. याबाबत मंत्रालयाने खा. मुंडेंशी संपर्क साधून इत्यंभूत माहिती दिली असून टीम-एड नावाची संस्थेच्या मदतीने चार वर्षीय विहाला लवकरच कुटुंबीयांकडे सोपविण्यात येईल असे सांगण्यात आले.

न्यू जर्सी मध्ये घडलेल्या बालाजी रुद्रवार आणि त्यांच्या पत्नीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात भारतीय परराष्ट्र खात्याने लक्ष घालत त्याची सखोल चौकशी करावी. तसेच अमेरिकेत एकट्याच अवस्थेत अडकलेल्या रुद्रवार दाम्पत्याच्या चार वर्षीय चिमुकलीला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती व्यवस्था करावी अशी विनंती खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी परराष्ट्र खात्याला ट्वीटद्वारे केली आहे. (Mystery of Rudrawar couple’s death)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!