धनंजय मुंडें प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसची भुमिका स्पष्ट….

मुंबईः दि.१५- गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाची भुमिका मांडली असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी दस्तुरखूद शरद पवार यांनीही माध्यमातून पक्ष लवकरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक होवून मुंडे प्रकरणावर चर्चा झाली. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सदरील प्रकरणावर भाष्य करताना पक्ष धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान सदरील प्रकरणातील रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर येत असून तिने यापुर्वीही अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. यामध्ये भाजपाचे मुंबई प्रांत उपाध्यक्ष कृष्णा हेगडे नंतर मनसेचे नेत्यासह एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे.