NEET Result… धारुर तालुक्यातील प्रशांत खाडे देशात सहावा.

किल्लेधारूर दि.3 नोव्हेंबर – धारुर तालुक्यातील कांदेवाडी येथील प्रशांत उर्फ उमेश संजय खाडे या विद्यार्थ्याने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून नीट परिक्षेत यश मिळवले असुन, त्याने नीटमध्ये जीवशास्त्र विषयात देशात सहावा क्रमांक मिळवला आहे. उमेश एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
(NEET Result … Umesh Kande from Dharur taluka is sixth in the country.)
धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव पासुन जवळच असलेल्या कांदेवाडी येथील प्रशांत उर्फ उमेश संजय खाडे याने यंदा वैद्यकीय पुर्व परीक्षेसाठी नीटची (NEET) परिक्षा दिली होती. सदर परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन, यात उमेश खाडे याने 720 गुणांपैकी 544 गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. जीवशास्त्र (Biology) विषयात त्याने 360 पैकी 350 गुण घेऊन देशात 6 वा क्रमांक (Ranking) पटकावला आहे.
प्रशांत उर्फ उमेश खाडे हा कांदेवाडी सारख्या ग्रामीण भागातील असुन, त्याचे प्राथमिक शिक्षण कांदेवाडी येथील शाळेत झाले. तर 5 वी ते 10 वी शिक्षण दिंद्रुड येथील शाळेत झाले. सुरूवाती पासुनच डाॅक्टर होण्याचे स्वप्न बाळगत त्यादृष्टीने त्याने तयारी चालु केली होती.
यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले होते. त्याने मिळवलेल्या यशाची बातमी ऐकुन त्याच्या आईवडिलांसह कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. उमेश खाडे याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.