बिबट्या पाठोपाठ आता गव्याची इंट्री…. आष्टी तालुक्यातील घटना

आष्टी दि.१ मार्च- आष्टी तालुक्यात बिबट्या, पाठोपाठ आता गव्याचे दर्शन झाले असून ऐन सुगीच्या दिवसात शेतकऱ्यासमोर नवीन संकट आले आहे. बिबट्या (Leopard) व रानडुक्कराची दहशत कमी होत नाही तोच थेट गावात रानगवा घूसल्याने सगळ्यांची घाबरगुंडी उडाल्याचा प्रसंग कऱ्हेवडगांव येथे दिसून आले. वनविभागाला (Forest Department) याबाबत माहिती देण्यात आली असून तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
(Following the leopard, now the entry of the cow …. Incident in Ashti taluka)

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आष्टी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर लपण असल्याने व पाण्याची सोय असल्याने वन्यजीव हजेरी लावत आहेत. या अगोदर बिबट्या (Leopard), रानडुक्कर यांनी याभागात मोठी दहशत निर्माण केली होती. यातून सावरत नाही तोच आता आडदांट समजला जाणारा रानटी गवा गावात आल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची हवा ताईट झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी शेजारील तालुका असलेल्या जामखेड येथील वंजारवाडीचे शेतकरी संतोष दराडे यांना गव्याने हल्ल्यात जखमी केल्याची माहिती आहे. वनविभागाने (Forest Department) या गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी पकडण्यात अपयश आले असुन हा गवा एखाद्याचा जीवही घेऊ शकतो असा आडदांट प्राणी आहे. वनविभागाने तातडीने परिसरात रेस्क्यू ऑपरेशन करून या गव्याला जेरबंद करावे अशी मागणी राम नागरगोजे, अंबादास बांगर, जालिंदर नागरगोजे, विजय विधाते यांनी केली आहे.

सदरील गवा सर्वप्रथम राम नागरगोजे, अंबादास बांगर, जालिंदर नागरगोजे यांनी पाहिला. रविवार दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या दरम्यान ज्वारी काढून परतत असताना टकले वस्तीजवळील भागिनाथ टकले यांच्या शेतात असलेल्या कपाशी मध्ये अचानक मोठा प्राणी समोर दिसला. प्रचंड घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी कधी न पाहिलेला प्राणी दिसल्याने गाडीवरून तीघे असल्याने लांबून त्यांनी गाडीच्या उजेडात मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले असून हे व्हिडिओ वनविभागाला देण्यात आले.

घटनास्थळी वनविभागाचे पथक रवाना झाले आहे. या भागात विषेश लक्ष ठेवून आहे. गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गव्याचा शोध घेण्याचे वनविभागाचे काम सुरू आहे. या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मातावळीचे वनरक्षक एन.के.काकडे, आष्टीचे वनरक्षक डी.जे.चव्हाण, चालक बी.डी.टाफरे दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!