खुनाची सुपारी आली अंगलट… गेला स्वतःचाच जीव

पुणे दि.६- पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये सासऱ्याने आपल्या सुनेच्या खुनाची सुपारी दिली होती. मात्र यामध्ये सासऱ्यालाच आपला जीव गमवावा लागला असल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

विनायक भिकाजी पानमंद यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. मात्र त्याने दोन वर्षापुर्वी घरच्यांना माहिती न देता प्रेमविवाह केला. याबाबत अजितचे वडिल विनायक पानमंद यांना माहिती झाली. त्यामुळे वडिल व मुलात नेहमी वाद विवाद होवू लागले. यानंतर सासरे विनायक यांना आपल्या मुलाचा पहिला संसार मोडल्याचं त्यांच्या मनात दु:ख होतं. त्यांनी आपल्या सुनेचा खून (Murder) करण्याचा कट रचला. यातूनच त्यांनी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना 1 लाख 34 लाखाची सुपारी दिली. दरम्यान, आरोपींनी गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये जाऊन दोन पिस्तुल आणले. मात्र महिलेला मारण्यासाठी आरोपी घाबरत होते. यामुळे सासरे हे आरोपींना खून (Murder) करता येत नसेल तर पैसे परत द्या असा तगादा लावून होते. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून खून (Murder) केला. पोलिसांनी (Police) दोन आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपी मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे. पोलीस (Police) त्याचा कसुन तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!