बीड जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश; बँकेच्या वेळेत अत्यंत महत्त्वाचा बदल.

बीड दि.10 मे – भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम जहाँगीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बँकेच्या व्यवहारात सुसुत्रता आणण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. सध्या रमजान ईद, अक्षयतृतिया सणांसह हॉस्पिटल, निराधार याचे पगार सर्व विषय वर चर्चा केली यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तात्काळ नवीन आदेश काढत बँकेच्या वेळात सकाळी 10 ते 2 दरम्यान सर्व बैंक चे व्यवहार सुरु ठेवण्याचे आदेश काढले असल्याची माहिती सलिम जहाँगिर यांनी दिली.
(New orders of Beed Collector; A very important change in the timing of the bank.)
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा (Corona Infection) वेग वाढत असून दररोज बाराशे पेक्षा जास्त नवीन कोरोना बाधित रुग्ण (Corona Positive) आढळून येत आहेत. यामुळे आता बीड जिल्हा प्रशासनाने नवीन आदेश काढत निर्बंध (Restrictions) अधिक कडक केली आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी (Collector) रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आज वेळोवेळी काढली आहेत. आज पुन्हा लोकांच्या गरजेचा निर्णय जिल्हाधिकारी जगताप यांनी घेतला आहे.
पुर्वीच्या आदेशात बँकेचे (Bank) कामकाज दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत अंतर्गत कामकाजासाठी व व्यवहारासाठी सुरु राहतील असा होता. यात सुधारणा करुन आता बँकेचे (Bank) कामकाज सकाळी 10 ते 2 पर्यंत व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. आदेशात शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप, गॕस ऐजन्सी, शासकीय अनुदान, शेती विषयक व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव असलेले व्यवहार यासाठीचा उल्लेख करण्यात आला आहे.
सुधारीत नवीन नियमावली...
1. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दि.8, 9, 10, 11 व 12 मे) या दिवशी केवळ औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्माट्युकल्स, फार्माट्युकल कंपन्या, इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना व डिलर, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सॕनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व सहाय्य सेवा, पेट्रोल पंप, टपाल सेवा हेच चालू राहणार.
2.दुध, भाजी व फळ विक्री दररोज सकाळी 7 ते 10 यावेळेत सुरु राहिल.
3. गॕस वितरण दिवसभर सुरु राहिल.
4. बँकेचे कामकाज सकाळी 10 ते 2 पर्यंत व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. आदेशात शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप, गॕस ऐजन्सी, शासकीय अनुदान, शेती विषयक व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव असलेले व्यवहार यासाठीचा उल्लेख करण्यात आला आहे.
5. रविवार, सोमवार (दि.9 व 10 मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणाऱ्या आस्थापना ज्यात किराणा दुकान, भाजीपाला, मटन, चिकन विक्री दुकाने, बेकरी व कृषीशी निगडित अस्थापना संपुर्णतः बंद राहतील.
6. मंगळवार व बुधवार (दि.11 व 12 मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणाऱ्या आस्थापना ज्यात किराणा दुकान, भाजीपाला, मटन, चिकन विक्री दुकाने, बेकरी व कृषीशी निगडित अस्थापना सकाळी 7 ते 10 सुरु राहतील.
7. सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे कार्यालय प्रमुखाचे ओळखपत्र असेल त्यांना ये जा करण्याची मुभा असेल.