महाराष्ट्रात 31 डिसेंबरपर्यंत नवीन नियमावली जारी; पहा कुठे असणार काय निर्बंध…

मुंबई दि.15 डिसेंबर – राज्यात सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट (New variant) ओमिक्रॉनचा (omicron) धोका वाढला आहे. काही निर्बंध (restrictions) असताना लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. यामुळे आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवीन नियमावली जारी केली आहे.

(New regulations issued in Maharashtra till December 31; See where the restrictions will be …)

उद्यापासून मुंबईत नवी नियमावली (guidelines) लागू होणार आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना केवळ 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे निर्बंध आणण्यात आलेत. पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल.

मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण (vaccination) झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. मुंबईत उद्यापासून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

काय आहेत मुंबई पोलिसांच्या नवीन सुचना?
-सर्व व्यक्ती ज्या एखाद्या कार्यक्रमाशी, सेवेशी निगडीत आहेत. आयोजक, सहभागी असणारे, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे पूर्णपणे लसीकरण असायला हवे.
-कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेलं हवं. अभ्यागत, ग्राहक यांचेही लसीकरण झाले पाहिजे.

-मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी.
-महाराष्ट्रात (Maharashtra) येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा 72 तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणी वैध असेल.

-कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केच लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या 1 हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!