धारुर निधन वार्ता… नितिन चव्हाण यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.

किल्लेधारूर दि.11 अॉगस्ट – तालुक्यातील चोरांबा येथील तरुण नितिन बन्सी चव्हाण (वय 40) यांचा रात्री एकच्या सुमारास हृदयविकाराच्या (heart attack) धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानं गावात शोककळा पसरली आहे.
(News of Dharur’s death … Nitin Chavan dies of a heart attack.)
धारुर तालुक्यात परिचित असलेले खाजगी वाहनचालक नितिन चव्हाण यांना आपल्या घरी असताना रात्री बारा वाजन्याच्या सुमारास अचानक छातीत त्रास होत असल्याने धारुर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात (SRTR) हलवण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नितिन हे धारुर (Dharur) शहरासह पंचक्रोशित हसतमुख चालक म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी व दोन मुलं आहेत. ते अल्पभुधारक शेतकरी होते. शेतीसह खाजगी वाहनातून ते आपली उपजिविका भागवत. त्यांच्या अकाली निधनानं धारुरसह चोरांबा गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.11 बुधवारी दुपारी चोरांबा येथील बस स्थानक परिसरातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.