धारुर निधन वार्ता… मेजर महादेव खामकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

किल्लेधारूर दि.22 नोव्हेंबर – धारुर शहराचे सुपूत्र निवृत्त मेजर (Major) महादेव किसनराव खामकर (54) यांचे अल्पशा आजाराने आज (दि.22) पहाटे एकच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर पुणे (Pune) येथे मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरु होते.
(News of Dharur’s demise … Major Mahadev Khamkar passed away due to Alpsha disease.)
धारुर (Dharur) शहरातील कसबा विभागातील मठ गल्लीतील रहिवासी सध्या अहमदनगर (Ahemadnagar) येथे स्थायिक असलेले निवृत्त मेजर महादेव किसनराव खामकर (54) यांनी 1985 मध्ये सैन्य दलात दाखल होत तब्बल 24 वर्ष सेवा केली. त्यांनी या काळात उत्तरप्रदेश, बबीना, मध्यप्रदेश, राजस्थान याठिकाणी काम केले. युनिट 88 आर्मड रेजमेंट मध्ये 24 वर्ष देश सेवा करत अधिकारी पदावरुन ते निवृत्त झाले.
काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने पुणे येथे मिलिटरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (दि.22) पहाटे एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत (passed away) मावळली. शांत संयमी आणि प्रेमळ स्वभाव असल्याने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं, सूना, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर धारूर येथील खामकर आणि सावंत यांच्या केज रोड लगत असलेल्या स्मशानभूमीत सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.