बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.26 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 5501 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 703 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4798 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही आज बाधितांची संख्या कमी आढळली असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
(Today’s corona update of Beed district; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 226 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 42 व आष्टी तालुक्यात 92 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 25 तर केजमध्ये 83 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आज बीड व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आली आहेत.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-226, अंबाजोगाई-42, आष्टी-92, धारुर-25, गेवराई-66, केज-64, माजलगाव-30, परळी-15, पाटोदा-46, शिरुर-63, वडवणी-33 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसांपासून हजाराच्या आत आहे. अजूनही ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. देशासह राज्यात दिलासादायक आकडेवारी असली तरी मृत्यू दर मात्र अधिक आहे. बीड जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध दि. 25 मेपासून पुन्हा सहा दिवसांसाठी दि.31 मेपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत बुधवारी कोरोना व्हायरसचे 208,886 नवीन रुग्ण आढळले असून या काळात सुमारे 4172 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी हाच आकडा 3,498 होता. त्याचवेळी नवीन रुग्ण 195,815 नोंदली गेली व ती दोन लाखांवरून खाली आली. कोरोनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाला आहे .