शेती विषयक

पुढील काही तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे ; बीडसह याभागाचा समावेश.

42 / 100 SEO Score

मुंबई दि.7 एप्रिल – ऐन उन्हाळ्याचा मध्यात असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसात उकाडा वाढला आहे. यातच हवामान विभागाने ( Meteorological Department ) आता नव्याने पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि कोल्हापुर विभागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात (Maharashtra) बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यातच पुढच्या दोन दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाने ( Meteorological Department ) वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात जोेरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज संध्याकाळी हवामान विभागाकडून महाराष्ट्रावरील सॅटेलाईट फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यानुसार, पुणे, संभाजीनगर (औरंगाबाद Aurangabad), अहमदनगर, कोल्हापूर, बीड (Beed), धाराशीव (उस्मानाबाद) आणि विदर्भात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी याची दखल घेवून पिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
( Next few hours dangerous for Maharashtra; Inclusion of this part with Beed. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!