आता एसटी बसला मिळणार सुरक्षा कवच; धारुर आगाराचा उपक्रम.

किल्ले धारूर दि.8 जुन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून धारूर एस टी आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 40 बस गाड्यांना ॲण्टी मायक्रोबाईल कोटिंग (anti-microbial coating) सुरू करण्यात आली असून दोन दिवसात सर्व गाड्यांना हे पुर्ण होईल असे अगारप्रमूख शंकर स्वामी यांनी सांगीतले.

राज्यात कोरोनाच्या वाढता प्रादूर्भावामुळे राज्यात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एसटीची (ST Bus) प्रवाशी वाहतूक दोन वर्षानंतर सुरू झालेली आहे. पुन्हा कोरोनामुळे (corona) प्रवाशी वाहतूकीवर परिणाम होऊ नये, एसटी बस वाहतूक सुरळीत सुरू राहावी व प्रवाशाचे आरोग्याची काळजीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (State Transport Corporation) बसेसला ॲण्टी मायक्रोबाईल कोटिंग करण्याची मोहीम दोन दिवसापासून सुरू आहे.

या उपक्रमात धारुर आगाराने आघाडी घेतली असून दोन दिवसात सर्व गाड्याना कोटींग करून घेण्यात येणार आहे. सध्या आगारातील 40 बसेसना ॲण्टी मायक्रोबाईल कोटिंग करण्यात आली आहे. या कोटींगचा दोन महिने प्रभाव राहणार आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कोरोनापासुन संरक्षण होईल असे आगारप्रमूख शंकर स्वामी यांनी सांगीतले.

( Now the ST bus will get anti-microbial coating shield; Dharur depot project. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!