नोकरी विषयक

वीज कोसळून एकाचा मृत्यू ; एक जखमी.

केज दि.13 एप्रिल – वीज कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना केज तालुक्यातील युसूफ वडगाव येथे घडली. आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट झाला. याच दरम्यान वीज कोसळून एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

बीड जिल्ह्यात आजही अनेक भागात वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. केज व धारुर तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून गारपीट व वीज कोसळण्याच्या घटना घडत असून यात अतोनात नुकसान होत आहे. आज दि.13 गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले असून वीजेचा कडकडाट सुरू झाला.

केज व धारुर तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे वीज कोसळून यामध्ये संकेत गित्ते रा. धोतरा हा शाळकरी मुलगा ठार झाला तर सुशांत वाकळे रा. केज हा जखमी झाला. जखमीवर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.
( One died due to lightning; one injured. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!