अपघातात एक ठार तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी….

आष्टीः दि.९ (प्रतिनिधी) तालुक्यातील पोखरी जवळ पिकअपच्या धडकेत (Accident) दुचाकीवरील कानिफनाथ भीमराव वांढरे (३६) हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. दुचाकीवर असलेल्या त्यांची पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसात (Police) याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टी (Ashti) तालुक्‍यातील पांढरी येथील कानिफनाथ वांढरे हे पोखरी येथे असलेल्या कुक्कुटपालनावर शुक्रवारी रात्री पत्नी सोनाली (३०) आणि मुलगी संस्कृती (९) यांच्यासोबत दुचाकीवरून (एम.एच. २३ ए. पी.५१८०) ते पोखरी गावाकडून जात होते. पोखरी गावाजवळ एका भरधाव पिकअपने (एम.एच.१४ व्ही.९०१९ ) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक (Accident) दिली. यात कानिफनाथ वांढरे जागीच ठार झाले तर पत्नी सोनाली व मुलगी संस्कृती गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत कानिफनाथ वांढरे यांच्यावर पांढरी गावी दुपारी १२ वा. मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टी (Ashti) पोलीस स्टेशनने पंचनामा करून पुढील तपास सहाय्यक पोलिस (Police) उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे, पो.कॉ. संजय गुजर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!