पदवीधरांच्या प्रश्न व समस्यांना शिरीष बोराळकरच योग्य न्याय देतील – पंकजाताई मुंडे

अंबाजोगाई दि.२६- पदविधरांच्या प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे (BJP) उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) हेच खर्या अर्थाने न्याय देतील, त्यांच्या पाठीशी पदविधरांनी खंबीरपणे उभे राहून पहिल्या पसंतीचे मतदान देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी केले.
मराठवाडा पदविधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत पदविधर मेळाव्याचे आयोजन बुधवारी सायंकाळी खंदारे मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. या प्रसंगी बोलताना पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, पदविधर मतदार संघातून बोराळकरांना विजयी करण्याचे स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न होते. त्यांच्या निधनामुळे गेल्या निवडणूकीत शोककळा निर्माण झाल्याने अत्यल्प मताने बोराळकरांचा पराभव झाला होता. मात्र त्या पराभवाचा वचपा या निवडणूकीत भरून काढू तुम्ही सर्व पदविधर आहात. उच्च शिक्षीतांनी कधीही जातीपातीचे राजकारण करू नये चांगली व्यक्ती पाहून मतदार केले पाहिजे. बोराळकरांच्या विजयासाठी जबाबदारीने यंत्रणा राबवा असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. पुढे बोलताना पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यासाठी जो निधी आणला त्या निधीवरच आजही जिल्ह्यात कामे सुरू आहेत. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते मतदारांचे लक्ष विचलीत करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता बोराळकर यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आ.नमिता मुंदडा (Namita Mundada), भाजपाचे ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर (Ramesh Adaskar), शिरीष बोराळकर (Shirish Boralkar), अक्षय मुंदडा (Akshay Mundada), प्रविण घुगे, माजी आ.केशवराव आंधळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, केज पंचायत समितीचे सभापती पती विष्णु घुले, भारत काळे, अविनाश मोरे, रमाकांत मुंडे, राहुल मोरे, शेख अब्दुल करीम, डॉ.देविदास नागरगोजे, डॉ.शालिनी कराड, मुरलीधर ढाकणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, मधुकर काचगुंडे, डॉ.अतुल देशपांडे, प्रा.विजय मुंडे, संदीप पाटील यांची उपस्थिती होती.