दिलासादायक शनिवार … बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.18 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1928 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 39 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 1889 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांची संख्या पन्नासच्या आत आल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-9, अंबाजोगाई-3, आष्टी-12, धारुर-0, गेवराई-0, केज-2, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-9, शिरुर-1, वडवणी-3 अशी आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पन्नासच्या आत आलेली कोरोना बाधितांची संख्या चालू आठवड्यात वाढली होती. ती आज पन्नासच्या आत आली आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,586 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 63 लाख 24 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के आहे.