हवामान

Orange alert मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज ; ऑरेंज अलर्ट जारी.

65 / 100 SEO Score

पुणे दि.12 मे – Orange alert महाराष्ट्राच्या काही भागासह कर्नाटक, केरळ या राज्यांत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, लातूर, नांदेड या 4 जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बीडसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कालपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. वेगवान वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होत आहे. यातच आज राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे. खासकरुन पुणे, सातारा, लातूर, नांदेड या 4 जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!