धारुरच्या सामान्य कार्यकर्त्याचा शरद पवारांनी केला मुंबईत सन्मान…

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) तालुक्यातील खामगाव (सध्या ता.परळी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते माणिक गायकवाड यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अभिप्राय अभियान पक्षाच्या वतीने राबवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रस पार्टी  (NCP) सामाजिक न्याय विभागाचे उलेखनिय कार्य केल्याबद्दल माणिक गायकवाड यांचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष (NCP) अभिप्राय अभियान पक्षाच्या वतीने राबवण्यात आले होते. ते काम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माणिक गायकवाड यांनी प्रामाणिक पणाने या अभियाना मध्ये त्यांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्या पर्यत पोहचण्याचा भिष्म पराक्रम केला. ज्यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय विभागातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. हे कार्य करण्याची संधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व आ.प्रकाश दादा सोंळके (Prakash Solanke) यांनी माझी सामाजिक विभागाच उपाध्यक्ष म्हणून निवड केल्यामुळे हे कार्य करू शकलो अशी प्रतिक्रिया माणिक गायकवाड यांनी दिली. या कार्यात शरद मुंडे यांनी खंबीर साथ दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!